अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 113 चाचण्यामध्ये केवळ आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण, बाळापूर, तेल्हारा व पातूर येथे चाचण्या झाला नाही. अकोट येथे 34 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे 32 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे 34 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशा प्रकारे दिवसभरात 113 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 10543 चाचण्या झाल्या असून 538 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.