बोर्डी(देवानंद खिरकर )-तक्रारदार देवानंद रमेश खिरकर यांनी मा.पालकमंत्री साहेब अकोला यांचेकडे दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मौजे बोर्डी येथिल तलाठी खामकर यांनी दि.9/3/2020 रोजी बोर्डी येथे वाहन क्रमांक एम एच 30 ए एन 255 हा रेतिचा ट्रक्टर पकडून जप्त करुन पंचनामा करुन बोर्ड़ीचे पोलिस पाटील प्रकाश उगले यांच्या ताब्यात दिल्यावरुन झालेल्या कार्यवाही बाबत सदर प्रकरणात आपले म्हणने मांडण्यासाठी दि.19/8/2020 रोजी दुपारी 12.00 वाजता कार्यालयात हजर राहावे.गैहजर राहिल्यास आपणाविरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी नोटिस अर्जदार,गैरअर्जदार,बोर्डी तत्कालिन तहसीलदार अकोट,यांना बजावली आहे.