अकोट (शिवा मगर)-कोरोना या महामारी चा सर्वत्र देशात आणि जिल्ह्यात कहर सुरू आहे कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता अकोट तालुक्यामध्ये तसेच ग्रामीण भागमध्ये सर्वत्र रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे खबरदारी घेता तोंडाला मास्क लावणे अनिवार्य झालेले आहे मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात खबरदारी म्हणून आठवड्यातील एक दिवस संपूर्ण लॉक डाऊन घोषित केलेला आहेच
तरी काही लोक तोंडाला मास्क न लावता अकोट शहरामध्ये रस्त्यांवर फिरताना आढळून येत आहेत अकोट शहराचे ठाणेदार मा.संतोष महल्लेसाहेब यांनी या गोष्टीची दखल घेत अकोट शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये त्यामुळे तोंडाला मास्क न लावणार्यांवर तसेच कुठलेही काम नसल्यावर शहरात ये जा करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची धडक मोहीम पोलिस प्रशासनाने चालू केलेली आहे तरी जनतेने विनाकारण घरा बाहेर पडू नये व सार्वजनिक ठिकाणी जाताना तोंडाला मास्क लावावे असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात येत आहे