बोर्डी(देवानंद खिरकर ): संपुर्ण देशात सुरु असलेल्या कोरोना या महामारीमुळे अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे आज बोर्डी येथे जी.प.शाळेमधे शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे,सोशल डिस्टन्सिंग ठेवत शाळेचे मुख्याध्यापक श्री.ऊमेशजी चोरे सर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.यावेळी प्रथमच सर्व शाळा बंद असल्यामूळे मुले व मुली यांच्या विना झेंडावंदन करन्यात आले.चोरे सर यांनी उपस्थित मंडळीचे आभार मानले.यावेळी रमेश गये तंटामुक्ती अध्यक्ष,देवानंद खिरकर पत्रकार,सुनिल गेबड शाळा समिती अध्यक्ष,यांचे हस्ते फोटोचे पूजन करुन भारत माता की जय जयघोष करण्यात आला.प्रीतम आतकड,उमेश चोरे,अजय अस्वार,प्रभाकर नागरे,शिवदास आढे,आनंद नांदुरकर,कु. किरण लहाने मैडम,कु. रूपाली सिरस्कार मैडम,कु.मनोरमा बुंदिले मैडम,कु.रचना शर्मा मैडम,पिंटू राजगुर,आदींची उपस्थिती होती.