कोरोना अलर्ट
आज शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१४८
पॉझिटीव्ह- १८
निगेटीव्ह- १३०
अतिरिक्त माहिती
आज सकाळी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील दहीगाव गावंडे येथील तीन जण, शिवनी, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, कृषि नगर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित जोगेश्वर प्लॉट, हिंगणा रोड अकोला, नानकनगर निमवाडी, देशमुख फाईल, अकोट, तेल्हारा व हिवरखेड तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. त्यात जूनी वस्ती, मुर्तिजापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि. ९ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच न्यू राधाकिसन प्लॉट, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष असून तो दि.५ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २७०९+५१७=३२२६
मयत-१३३, डिस्चार्ज- २५९९
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४९४
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!