तेल्हारा (प्रतिनिधी)- चितलवाडि येथील सुनिल चांदुरकार यांच्या कीडनी या आजाराने मृत्यूची शाई वाळते वाळते तोच लगेच दुसऱ्याच दिवशी किडनी आजाराने १ तर किडनी सदृश्य आजाराने १ असे आज दोन बळी घेतले.सदर गावात गेल्या काही वर्षांपासून मृत्यूचे थैमान घातले असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना बच्चू कडू यांचा आज जिल्हा दौरा असून मृत्यूचे थैमान घातलेल्या या गावात पालकमंत्री भेट देऊन या बाबत पाऊले उचलणार का असा सवाल आज रोजी गावकऱ्यांना पडला आहे.
चीतलवाडी गावात किडनी रोगाचे थैमान असून गेल्या काही दिवसांअगोदर सुनिल चादुरकार यांचा १२ ऑगस्ट रोजी तर मैनाबाई.देवळे यांचा १४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असून याच दिवशी किडनी सदृश्य आजाराने रामकृष्ण विठ्ठल चादुरकार या ४५ वर्षीय भूमिहीन शेतमजुरांचादुर्दैवी मृत्यू झाला परंतु त्याचा परिवाराचे म्हणण्यानुसार पिण्याचे पाणी दुषित असल्यामुळे त्यांना पोटाचा आजार जडला असुन त्याचा परिणाम किडनी वरही झाल्याचे त्यांच्या परिवाराचे म्हणणे आहे व या पुर्वी ८ दिवस अगोदर याच आजाराने एका महिलेचा मृत्यू झाल्याचे नागरिक बोलत आहेत
या गावात एवढी भयानक परिस्थिती असुन सुद्धा आरोग्य खात्याच्या आरोग्य सेविका वर्षा मेश्रामकर यांनी सर्व्हे केला
मात्र कोणताही अधिकारी फिरकला नाही या वरुन या वरुन आरोग्य खात्याला चीतलवाडी गावाचे घेणे देने नसल्याचे दिसून येत असुन गावकर्यांनी रोष व्यक्त केला आहे
तसेच या गावात पिण्याचे पाण्यापासून हा आजार जडतआहे.असे गावकऱ्यांचे ठाम मत आहे परंतु येथील बोअरचे पाणी प्रशासन व उत्कृष्ट लॅब मध्ये का तपासून घेत नाही.तसेच या बाबत अनेक लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी तुमच्या गावात ८४ खेडी अंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येईल असे दिले परंतु पाणी तर सोडा निवडणुकीपूर्वी कोणाला सर्दी पडसा.झाला तर भेट देणारे लोकप्रतिनिधी फिरकले सुध्दा नसल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.मात्र आज कर्तव्यदक्ष पालकमंत्री कडू यांचा जिल्हा दौरा असून अकोट येथे ते येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर चितलवाडी गाठून गावकऱ्यांची समस्या निकाली काढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या आजाराने निधन पावलेल्या व्यक्ती बहुधा भूमिहीन असल्याने त्यांचे कुटुंबावर घरातील कमावता व्यक्ती गेल्याने मुलाबाळांवर उपासमारीची वेळ आली आहे
तरि शासन व प्रशासन अजुनही कीती बळी जाण्याची वाट बघनार असे गावकरी बोलत असुन आता तरी लोकप्रतिनिधी दखल घ्यावी अन्यथा १५ ऑगस्ट नंतर लोकशाही मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु असे सुज्ञ नागरिक बोलताना दिसत आहेत
आमच्या गावात किडनी रोगाचे थैमान चालू आहे या बाबत लोकप्रतिनिधी व शासनाचे धोरण उदासीन आहे तरि एक महीन्यात यावर तोडगा निघाला नाही तर मी उपोषण करील
शिवा मेतकर( उपसरपंच )
चीतलवाडी