तेल्हारा(प्रतिनिधी) –
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा शहराला जोडणाऱ्या रस्ताची कामे जलदगतीने व्हावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस समिती उपाध्यक्षा डॉ सौ संजिवनी ताई बिहाडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना दिले आहे
तेल्हारा तालुक्याला जोडणारे तेल्हारा – आडसुळ, तेल्हारा हिवरखेड तेल्हारा घोडेगाव हे प्रमुख व अती रहदारीचे
रस्ते तिन ते चार वर्षांपूर्वी खोदकाम करुन बनविण्याचे फक्त दाखविण्यात आले प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानंतर फक्त खोदुन माती व काही प्रमाणात खडी टाकून भाजप शासन असताना अर्धवट सोडण्यात आले आहेत या रस्ताची अवस्था गंभीर बनली आहे त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे हे रस्ते रहदारी योग्य नाहीत पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखलामुळे वाहन फसतात घसरतात अशी अवस्था आहे शासन बदलले असून सार्वजनिक बांधकाम विभाग हा आपले माध्यमातून आपले पक्षाकडे आहे साहाजिकच कार्यकर्त्यांच्या विकास कामांकरिता अपेक्षा वाढल्या आहेत मी एक जबाबदार पदाधिकारी असल्यामुळे माझेकडे या रस्त्यांचे तक्रारीबाबत असंख्य लोक येवुन भेटत आहेत या रस्त्यांचे नुतनीकरणाचे कामात आपण लक्ष देवुन ही कामे त्वरीत करण्यात यावी जेणे करुन नागरिकांना होणाऱ्या त्रासातुन मुक्ती मीळु शकेल अशा आशयाचे निवेदन डॉ सौ संजिवनी ताई अशोकराव बिहाडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना दिले आहे