• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वडिलोपार्जित संपत्तीत मुलांप्रमाणेच मुलींचा समान वाटा; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Media Desk by Media Desk
August 11, 2020
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
88 1
0
सुप्रीम कोर्ट
40
SHARES
634
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने मुलींच्या हक्काबाबत मोठा निर्णय दिला आहे. वडिलांच्या संपत्तीत मुलींचा मुलांबरोबर समान हक्क आहे. जन्मासोबतच मुलगी वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सेदार होते. वडिलांचा मृत्यू हिंदू वारसा हक्क कायदा (सुधारित) २०५ लागू होण्यापूर्वी झाला असेल तरीही मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर समान अधिकार असेल, असे सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज स्पष्ट केले आहे.

१९५६ मधील मूळ हिंदू वारसा हक्क कायद्यात (हिंदू सक्सेशन अ‍ॅक्ट) मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळत नव्हता. मात्र २००५ मध्ये या कायद्याच्या दुरुस्ती करण्यात आली. यामुळे वडिलोपार्जित संपत्तीत मुलींनाही मुलांएवढाच समान वाटा मिळण्याची तरतूद करण्यात आली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

वडिलापार्जित संपत्तीत मुलींचा मुलांबरोबर समान हक्क आहे. जर मुलीचा मृत्यू ९ सप्टेंबर २००५ पूर्वी झाला असला तरी वडिलांच्या संपत्तीत तिचा हक्क कायम राहतो. याचाच अर्थ असा आहे की मुलीची मुले देखील आपल्या आईच्या वडिलांच्या (आजोबा) संपत्तीतील हिस्सा मिळवण्यासाठी दावा करू शकतात. यावर सुप्रीम कोर्टाने जोर दिला आहे.

वडिलोपार्जित संपत्तीवर मुलाप्रमाणे मुलीलाही समान अधिकार मिळावा, या मुद्यावर बराच वाद ​सुरु होता. अखेर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी यासंबंधीचा ऐतिहासिक निकाल सुनावला. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान वाटा मिळेल, असा निकाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने सुनावला. कुठल्याही स्थितीत हा निर्णय लागू राहील, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना त्यांच्या भावाप्रमाणे समान वाटा मिळेल, असे २००५ मध्ये अधिनियमित केले गेले होते. नियमांन्वये मुलामुलींना वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. परंतु, २००५ पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल, तर त्यांना याचा लाभ मिळेल की नाही? हे कायद्यातून स्पष्ट होत नव्हते. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल, असा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा दिलाच पाहिजे. मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो मुलगा असतो. पण, मुलगी ही कायम मुलगीच असते, असे न्या. मिश्रा यांनी स्पष्ट केले. पूर्वी १९५६ च्या कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या संपत्तीचा हिस्सा मिळत होता. परंतु, २००५ मध्ये केंद्र सरकारने यात बदल केला. मात्र, त्यात २००५ सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळेल असा बदल करण्यात आला होता. आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत मुली आता हक्काने त्यांचा वाटा मागू शकतील.

आधी काय होता नियम?

मुलींना वडिलोपार्जित संपतीत वाटा मिळण्याबाबत ‘हिंदू वारसा हक्क कायदा-१९५६’ हा कायदा होता. या कायद्यानुसार, वडिलांच्या संपत्तीत मुलीला वगळून वाटणी व्हायची. त्यानंतर वडिलांना जो वाटा मिळाला असेल त्यांची पुन्हा मुलांच्या संख्येनुसार वाटणी व्हायची आणि त्यात सर्व मुलांना समान हिस्सा मिळायचा. चार राज्यांनी १९९४ मध्ये या कायद्यात बदल केला. नवीन बदलानूसार १९९४ नंतर ज्या मुलींचे लग्न झाले त्यांना ​वडिलोपार्जित मालमत्तेत समान वाटा मिळेल. तर, १९९४ पूर्वी लग्न झालेल्या मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणार नाही असा बदल करण्यात आला होता. आत या संपूर्ण कायद्यातच बदल करण्यात आला असून मुलीला समान वाटा मिळणार आहे.

Previous Post

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी “या” व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण होणार

Next Post

अकोला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याची माणूसकी, हरविलेला मोबाईल परत केला

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला वाहतूक कर्मचारी

अकोला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याची माणूसकी, हरविलेला मोबाईल परत केला

सीईटी

राज्यातील सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा,सीईटी होणार !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.