आज मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- १३८
पॉझिटीव्ह- ३०
निगेटीव्ह- १०८
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १६ महिला व १४ पुरुष आहेत. त्यातील रवी नगर व मोठी उमरी येथील पाच जण, जोगळेकर प्लॉट, नवीन भिम नगर व पुनोती येथील तीन जण, वाडेगाव व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित शिवर, सीएस ऑफीस, जूने शहर, अकोट, गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गंगा नगर, बायपास, जूने शहर अकोला येथील ५१ वर्षीय पुरुष असून तो दि. ९ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २६०७+४९०=३०९७
मयत-११७, डिस्चार्ज- २४२५
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५५५
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!