बोर्डी(देवानंद खिरकर )– अकोट तालुक्यातील बोर्डी येथे सालाबाद प्रमाने गेल्या कित्येक वर्षानुवर्षे सुरु असलेली श्री संत नागास्वामी महाराज यात्रा आज कोरोना या महामाहीरीमुळे शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करित शांततेत नागास्वामी महाराज मंदीरामध्ये सकाळी जलअभिषेक,पुजाआरती करुन,मंदिराचा रथ हा गावातून न काढता नागास्वामी मंदिराजवळ उभा करण्यात आला व जागेवरच लोकांनी रथाचे दर्शन घेतले नागास्वामी महाराज अध्यक्ष,व सर्व समिती मंडळ यांचे उपस्थितीत यात्रा शांततेत पार पडली यावेळी अकोट ग्रामीणचे ठाणेदार फड साहेब यांनी बोर्डीला चोख बदोबस्त लावला होता.