अकोट (देवानंद खिरकर)- कर्नाटकमधील बेळगांव जिल्ह्यात माणगुत्ती या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रातोरात हटवण्यात आल्याने आज जाहीर निषेध करण्यासाठी अकोट शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौक येथे सकाळी 8:30 वाजता जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप दादा बोचे तालुका प्रमुख श्याम दादा गावंडे युवासेनचे विस्तारक राहुल भाऊ कराळे,तालुका संघटक कुणाल कुलट, विजय भारसाकळे,देव नुपनारायण,अमोल बदरखे,व शिवसेनेचे आजी,माजी, पदाधिकारी,व युवासेनचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमींनी छत्रपति शिवाजी महाराज चौक आकोट येथे उपस्थित होते.