मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिधारकांना ई-पॉस मशीनवर अंगठा (फिगंर) लावल्यावरच धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.परंतु यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळेच शिधापत्रिकाधारकांसोबतच दुकानदार दोघांनाही कोरोना ची बाधा होण्याची शक्यता असल्याने सोबतच शासनाने सदर निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणेच धन्य वितरण सुरू ठेवावे अशी मागणीही रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटकाळामध्ये सर्वांना धान्य उपलब्ध व्हावे यासाठी मार्च ते जुलै पर्यंत शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशिनवर अंगठा न लावताच धान्य वितरण करण्यात येत होते.परंतु आता शासनाने ऑगस्ट महिन्यापासून ई-पॉस मशीनवर अंगठा (फिंगर)लाऊन व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य केले आहे आता सर्वत्र कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अशात जर ई-पॉस मशीनचा दुकानदार व शिधापत्रिकाधारकांकडून वापर झाल्यास दोघांनाही कोणाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कार्डधारक व रेशन दुकानदार यांना कोरोनाची बाधा होऊ नये.