रिधोरा (पंकज इंगळे) – बाळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या रिधोर येथे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागासह प्रशासनाच्या प्रयत्नाने व गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे काल दि. 8 रोजी रिधोरा येथील 179 नागरिकांच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत रिधोरा येथे चार दिवसापूर्वी म्हणजे मंगळवारी (ता 4 ) रोजी गावामध्ये 21 वर्षीय युवती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तसेच त्या तरुणीच्या संपर्कात आलेले तिच्या कुटुंबातील 3 जण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे गावामध्ये पूर्ण भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. वाढती रूग्ण संख्या लक्ष्यात घेता प्रशासनाने व येथील कोरोना समितीने रिधोरा येथे कोरोना सॉप चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल रिधोरा येथे 179 नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले .
काल तपासणी करण्यात आलेल्यामध्ये हायटीयूमधील 38 तर गावातील 26 गरोदर महिला तसेच रक्तदाब , अस्थमा आदींचे आजार जडलेल्या व अन्य नागरिकांची तपासणी करून ऐकून 179 नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात येऊन ते चाचणीसाठी अकोला जी एम सी येथे पाठविण्यात आले आहेत . त्या वेळी बाळापूर तालुका तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, पारस येथील वैद्यकीय टीम व रिधोरा ग्राम पंचायत सरपंच सौ. नंदा अनिल दंदी , उपसरपंच मंगेश गवई , सचिव आर आर इंगळे , महसूल विभाग रिधोरा तलाठी प्रशांत बुले, गाव पोलीस पाटील सुजय देशमुख , व स्वतःच्या जीवाची व आपले स्वतःचे कुटुंब समजून घेणाऱ्या म्हणजे आरोग्य उपकेंद्र रिधोरा येथील आशा सेविका , निर्मला दंदी, ज्योती तराळे , माया शेंडे, व गावातील कोरोना समिती काही गावातील नागरिक धर्मेंद्र दंदी, अनिल दंदी, इंद्रजीत देशमुख, गोपाल वाघ , व इतर यांनी गावामध्ये शिबीर यशस्वी व्हावे म्हणून प्रयत्न केले . तसेच नागरिकांनी सुद्धा तपासणीसाठी स्वतःहुन पुढे येऊन चांगला प्रतिसाद दिला.