कोरोना अलर्ट
आज रविवार दि.९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- २४३
पॉझिटीव्ह-३०
निगेटीव्ह-२१३
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ३० जणांचे अहवाल अक्टिव्ह रुग्ण आले. त्यात आठ महिला व २२ पुरुष आहेत. त्यात मूर्तिजापूर येथील सात, दाळंबी येथील सहा,केळकर हॉस्पिटल येथील पाच,खांबोरा येथील तीन, खडकी येथील दोन, विठ्ठल नगर येथील दोन, तर अकोट, शिवाजी प्लॉट, रामदास पेठ, निमकर्डा व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री एका ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला तेलीपुरा मूर्तिजापूर येथील रहिवासी असून दि.६ रोजी दाखल झाली होती,काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्या व अक्टिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे,याची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २५३६+४७५=३०११
मयत-११६, डिस्चार्ज- २३७४
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५२१
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!