तेल्हारा (प्रतिनिधी)- राज्यातील सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी आज अकोट विधानसभा आमदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना प्रश्न निकाली काढण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत नागपूर येथे दि ७ मार्च २०१९ रोजी आमदार व संबंधित अधिकारी यांच्यासोबत समाजाचे सदस्य यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून अनेक प्रश्न निकाली काढण्यासाठी मान्यता दिली होती त्याप्रमाणे दि २९ जून रोजी २०१९ ला कक्ष अधिकारी यांनी संबंधित विभाग प्रमुखांना कळविले होते.मात्र आज रोजी पर्यंत शासनाच्या वतीने कुठलेही प्रश्न निकाली काढण्यात आले नाहीत.त्यामुळे दि २४ जुलै रोजी राज्यभर आमचे प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केली होती मात्र अद्याप कुठलेही पाऊल उचलले गेले नाही त्यामुळे आज पुन्हा अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस च्या वतीने आ प्रकाश भारसकले यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करून प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे.यावेळी संघटनेचे संघटन मंत्री श्यामजी पिवाल,शाखा अध्यक्ष सागर सारवान, शामलालजी बघन उपस्थित होते.