तेल्हारा (प्रतिनिधी)- नाफेड ने खरेदी केलेल्या हरभरा ची वाहतूक करीत असलेल्या वाहन चालकाला राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तथा खरेदी विक्री संस्थेचे संचालक पुंडलिक अरबट यांनी अश्लील शिविगाळ ,मारहाण केली असता वाहन चालकाने दिलेल्या फिर्यादी नुसार तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये पुंडलिक अरबट यांच्यावर विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार नाफेड ची हरभरा खरेदी खरेदी विक्री संस्थे अंतर्गत सुरू होती खरेदी केलेला माल अकोला येथे वेअर हाउस ला जात असताना सदर वाहन ट्रक दापुरा फाट्याजवळ पलटी झाला त्यामुळे पलटी झालेल्या माल हा दुसऱ्या वाहनात भरीत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा परिषद चे माजी शिक्षण सभापती तथा खरेदी विक्री संस्थेचे संचालक पुंडलिक अरबट हे घटनास्थळी पोहचले त्यांनी वाहन चालक सचिन अशोक अढाव रा.बेलखेड याला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली सदर घटना 4 ऑगस्ट रोजी घडली असता सदर वाहन चालकाने 6 ऑगस्ट रोजी पुंडलिक अरबट यांच्या विरुद्ध तक्रार दिली असता तेल्हारा पोलिसांनी पुंडलिक अरबट यांच्या विरुद्ध कलम 294,323,504,506 अन्वये गुन्हा दाखल केला