अकोला- राष्ट्रवादी युवक काँग्रेस अकोला जिल्हा साठी विधानसभा मतदारसंघनिहाय अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.त्यात पहिल्या टप्प्यात तीन विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून तीनही अध्यक्षांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेससाठी मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदाची जबाबदारी सचिन बोनगिरे यांना सोपविण्यात आली. अकोला पूर्व विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वप्निल उपकारे यांचेकडे सोपविण्यात आली तर अकोट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी सतीश हांडे यांच्याकडे सोपविण्यात आली. उर्वरीत कार्यकारणी पंधरा दीवसात करण्यात येईल असं ठरले यावेळेस राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री मा. श्री. गुलाबरावजी गावंडे यांच्या मार्गदर्शनात, राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार मा.श्री. हरिदासजी भदे, जिल्हाध्यक्ष मा.श्री. संग्रामभैय्या गावंडे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा पिसे पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी मा. डॉ. आशाताई मिरगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या हस्ते एका कार्यक्रमात वरील तीन विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी तीनही विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांनी आता जोमाने कामाला लागून पक्षवाढीसाठी, संघटन वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे निर्देश राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री मा. श्री. गुलाबरावजी गावंडे, माजी आमदार मा. श्री. हरिदासजी भदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांनी दिले. पक्ष संघटनाचे कार्य करताना काहीही मदत लागल्यास आपण मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा पिसे पाटील, डॉ. आशाताई मिरगे यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमाला जिल्हा परीषद सदस्य विशाल गांवडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगराध्यक्ष करण दोड, परीमल लहाने, सुनील शिरसाट, अमोल लोकरे, मोहन शेळके यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.अशी माहीती जिल्हा प्रसीद्ध प्रमुख मोहन शेळके यांनी दीली