अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप पिकांचा विमा काढण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली आहे. त्यानुसार राज्यात ९३ लाख शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला असून, त्यामध्ये सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या सर्वाधिक आहे. तर कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. विमा काढल्यानंतर नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने, कपाशी पिकाचा विमा काढण्याकडे शेतकºयांनी कानाडोळा करीत, सोयाबीन पिकाचा विमा काढण्याकडे कल वाढविल्याची बाब समोर येत आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यात कपाशी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पृष्ठभूमीवर पीक विमा योजनेंतर्गत कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात असणे अपेक्षित असले तरी गेल्या काही वर्षात कपाशी पिकाचा विमा काढल्यानंतर पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने पीक विमा योजनेंतर्गत कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या कमी होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामात खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली आहे. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत राज्यातील ९३ लाख शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला असून, त्यामध्ये सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली. त्यानुसार पीक विमा योजनेत सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी, कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यानुषंगाने विमा काढल्यानंतर पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने, कापूस उत्पादक शेतकºयांनी पिकाचा विमा काढण्याकडे कानाडोळा करीत, सोयाबीन पिकाचा विमा काढण्याकडे कल वाढविला आहे.त्यामुळे पीक विमा योजनेत सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना, कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांच्या संख्येत घट होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.