कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- २४
पॉझिटीव्ह- ७
निगेटीव्ह- १७
अतिरिक्त माहिती
आज सकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. त्यातील मुर्तिजापूर येथील दोन जण तर उर्वरित जूने शहर, वाळेगाव, कौलखेड, न्यू राधाकिसन प्लॉट व डाबकी रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान एकाचा मृत्यू झाला. त्यात ५० वर्षीय पुरुष असून ते मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. त्यांना दि. ३१ जुलै रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३३९+३६९=२७०८
मयत-११३, डिस्चार्ज- २२०९
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह- ३८६)
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!