अकोट (शिवा मगर)- अकोट दि 01 ऑगस्ट दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कुटासा गावामध्ये अवैधरित्या देशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री प्रेमानंद कात्रे यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला असता त्या ठिकाणी आरोपी मनोज पातोंडे व,सोनू जयस्वाल अवैधरित्या दारू विक्री करत असताना ग्राम कुटासा गावात एका घरामध्ये आढळून आलेत घटनास्थळी पंचनामा केला असता त्यांच्याजवळ देशी दारू टॅंगो पंच सीलबंद 71 कॉटर एकूण मुद्देमाल 1846 रु जप्त करण्यात आला सदर कारवाई ही कुटासा बीडचे बीट जमादार HC अरुण घोरमोडे ब न 643 तसेच PC ठाकूर ब न 1250 यांनी केली