भांबेरी (योगेश नायकवाडे): काल तालुक्यात काही ठिकाणी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती कामे करण्यासाठी गेली असता काल ता.31शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी लगबगीने आपापल्या घराकडे निघाले मात्र पाऊस कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात झाल्यामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला यामध्येच तेल्हारा तालुक्यातील ग्राम भांबेरी येथील शेतकरी रविंद्र माधव घेंगे हे गावालगतच असलेल्या शेतरस्त्यांनी शेतातून आपली बैलजोडी घरी घेऊन येत असतांना लेंडिच्या नाल्याला अचानक आलेल्या पुरामधे पाण्याच्या प्रवाहाने बैलजोडीसह बंडी पलटी झाली व यामध्ये अंदाजे 50हजार रूपये किंमतीचा एक बैल पुरामध्येच मरण पावला व बंडीचे सुद्धा नुकसान झाले शेतकऱ्यांने मात्र समय सुचकता बाळगुण आपला जिव वाचविला यामुळे सदर शेतऱ्याला मोठा फटका बसला असून याविषयी शेतकऱ्यांने पटवारी यांच्या कडे माहिती देऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे.