अकोट (देवानंद खिरकर)-अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथिल पोलिस पाटील प्रकाश उगले यांनी नायब तहसीलदार राजेश गुरव व तलाठी खामकर यांनी जप्त करुन पोलिस पाटील प्रकाश उगले यांच्या ताब्यात दिलेला अवैध रेति चोरीचा ट्रक्टर कारवाई होण्याच्या आधिच पोलिस पाटिल प्रकाश उगले यांनी परसस्पर सोडल्या प्रकरणी जिल्हाधिकारी,पालकमंत्री,उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार गिते यांना चौकशी अहवाल सादर करणे बाबत दिलेल्या पत्राप्रमाणे तहसीलदार गिते यांनी दि.28/7/2020 ला चौकशी करून बोर्ड़ीचे पोलिस पाटिल प्रकाश उगले यांनी कर्त्यतव्यात कसूर केल्या बद्दल त्यांना निलंबित करण्यात यावे असा अहवाल उपविभागीय अधिकारी अकोट यांचेकडे कारवाई करिता सादर केला आहे.तरी आता बोर्ड़ीचे पाटील यांच्या विरुध्द निलंबनाची कारवाई होणार हे मात्र जवळपास निच्चित झाले आहे.उपविभागीय अधिकारी अकोट यांनी देखील पोलिस पाटील यांना तात्काळ शोकाज नोटिस बजावली आहे.नोटिसचे उत्तर प्राप्त होताच पुढिल कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी अकोट यांनी तक्रारदार देवानंद खिरकर यांना सांगितले आहे.