• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 20, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मिशन बिगेन अंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी ; शहरासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता सुधारित आदेश जारी – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Media Desk by Media Desk
August 1, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 2 mins read
79 1
0
Jitendra Papalkar
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला– कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मिशन बिगेन’ अंतर्गत दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 त्यानुसार अकोला शहरासह जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. बाजारपेठा, दुकाने, भाजीपाला, फळे यार्ड, पेट्रोल पंप, सलून, बँका आदी सर्व बाबतीत यापूर्वी लागू असलेले आदेश 31 ऑगस्टपर्यंत कायम राहतील.  ऑगस्ट महिण्याच्या प्रत्येक रविवार कडक संचारबंदी लॉकडाऊन लागू राहिल. या पुर्वीच्या आदेशानुसार निर्बंधामध्‍ये देण्‍यात आलेली  सुलभता व टप्‍पानिहाय लॉकडाऊन उघडण्‍याबाबतचे आदेश  कायम ठेवून सुधारीत आदेश संपूर्ण अकोला शहर व जिल्‍हातील शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहतील.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

  1. सर्व प्रकारच्‍या अत्‍यावश्‍यक सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्‍ठाने, दुकाने व ज्‍यांना यापूर्वी सुरु ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात आलेली आहे ती यापूढे सुध्‍दा नियमित सुरु राहतील.
  2. दिनांक ३.६.२०२०  नुसार रस्ता व गल्ली यांच्या एका बाजूला असलेली  सर्व प्रकारची प्रतिष्‍ठाने ,दुकाने          (मॉल्‍स व मार्केट कॉम्‍प्‍लेक्‍स वगळून ) सम व  विषम तारखेस सकाळी  नऊ ते  सात यावेळेत  सुरु ठेवण्‍याबाबतचे  आदेश रद्द करण्‍यात येत आहे.  यापूढे दोन्‍ही  बाजूची   सर्व प्रकारची दुकाने, प्रतिष्‍ठाने  सोमवार ते शनिवार (रविवार वगळून)  सकाळी नऊ ते सायं. सात पर्यंत विहीत करण्‍यात आलेल्‍या अटी व शर्तीनुसार सुरु राहतील.  या बाबत आयुक्‍त, महानगरपालिका व संबंधीत नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी यांनी नियोजन करावे.
  3. सर्व प्रकारचे मॉल्‍स व मार्केट कॉम्‍प्‍लेक्‍स हे  खाद्यगृहे , रेस्‍टॉरेन्‍ट वगळता बुधवार दि. ५ ऑगष्‍ट २०२० पासून  सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत सुरु राहतील तथापी अशा मॉल्‍स व मार्केट कॉम्प्लेक्‍स मधील असलेली रेस्‍टॉरेंट मधील किचन व खाद्यगृहे यांना घरपोच सेवा देण्‍याकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.
  4. मद्यविक्री पूर्वीच्‍या आदेशानुसार सुरु राहील.
  5. इ कॉमर्स क्षेत्राकरिता सर्व प्रकारच्‍या अत्‍यावश्‍यक व बिगर अत्‍यावश्‍यक सेवा सुरु ठेवण्‍याकरिता परवानगी राहील.
  6. महानगरपालिका,नगर परिषद,नगर पालिका क्षेत्रातील सर्वप्रकारची बांधकामे ( सार्वजनिक/खाजगी/शासकीय) ज्‍यांना परवानगी  प्रदान करण्‍यात आलेली आहे ती  सर्व  सुरु राहतील.  पावसाळयापूर्वी करावयाची सर्व प्रकारची ( सार्वजनिक/खाजगी/शासकीय) कामे सुरु राहतील.
  7. रेस्‍टॉरेंट व खाद्यगृहे यांचेमार्फत घरपोच सेवा देता येतील.
  8. ऑनलाईन शिक्षण व त्‍या संबंधीत उपक्रमांना परवानगी राहील.
  9. स्‍वयंरोजगार उपक्रमासंबंधी असलेल्‍या व्‍यक्‍ती उदा. नळ कारागीर, ईलेक्‍ट्रीशिएन, किड नियंत्रक, तांत्रीक कामे करणारे यांना त्‍यांची कामे करण्‍याची परवानगी अनुज्ञेय राहील.
  10. सर्व प्रकारचे वाहन दुरुस्‍ती गॅरेज, कार्यशाळा यांनी वाहन दुरुस्‍ती करिता ठराविक वेळ देवून कामे करावी .
  11. अत्‍यावश्‍यक तसेच कार्यालयीन कामाकरिता जिल्‍हा अंतर्गत हालचाल करण्‍यास परवानगी अनुज्ञेय राहील.
  12. ग्राहकांनी दुकानामध्‍ये खरेदी करण्‍याकरिता जवळपास असलेल्‍या बाजारपेठेचा वापर करावा. शक्‍यतो दुरचा प्रवास करुन खरेदी करणे टाळावे.
  13. लग्‍न समारंभ व  अंतिम संस्‍काराकरिता  यापूर्वी पारीत करण्‍यात आलेले आदेश कायम ठेवण्‍यात येत आहे.
  14. सर्व बाहय ठिकाणच्‍या सार्वजनिक हालचाली हया पूर्वी दिलेल्‍या निर्बधासह सुरु राहतील.
  15. वृत्‍तपत्र व वृत्‍तपत्र छपाई व वितरणास घरपोच सेवासह परवानगी अनुज्ञेय राहील.
  16. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये ( विद्यापिठ,महाविद्याल, शाळा ) येथील अशैक्षणिक कर्मचारी , संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना इमाहिती उत्‍तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे इ. कामाकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.
  17. सर्व प्रकारची केशकर्तनालयाची दुकाने, सलुन, ब्‍युटीपालर्र या कार्यालयाचे पूर्वीचे आदेशानुसार सुरु राहतील.
  18. बाहय असंघीक खेळ( Outdoor Games)उदा. गोल्‍फ, फायर रेन्‍ज, जिम्‍न्‍यॉस्टिक , टेनिस , बॅडमिंटन, मलखांब या खेळांना भौतिक व सामाजिक अंतर राखून तसेच निर्जतुंकीकरण व प्रतिबंधात्‍मक उपाययोजनासह दिनांक  ५ ऑगष्‍ट २०२० पासून सुरु ठेवण्‍यास परवानगी अनुज्ञेय राहील. तथापी जलतरण तलाव यांना सुरु ठेवण्‍यास परवानगी राहणार नाही.
  19. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक यांना टॅक्‍सी,कॅब व अॅग्रीगेटरसाठी अत्‍यावश्‍यक वेळेस १+३ प्रमाणे, अॅटो रिक्‍शासाठी अत्‍यावश्‍यक वेळेस १+ २ प्रमाणे, चारचाकीसाठी अत्‍यावश्‍यक वेळेस १+३ तर दुचाकीसाठी १+ १ मास्‍क व हेलमेटसह प्रमाणे परवानगी राहिल.
  20. याव्‍यतिरिक्‍त यापूर्वीच्‍या आदेशान्‍वये परवानगी दिलेल्‍या सर्व उपक्रमांना दिनांक ३१ ऑगष्‍ट २०२० पर्यंत अनुज्ञेय राहील.

ऑगष्‍ट महिन्‍यातील येणाऱ्या सर्व रविवारी पुर्णता लॉकडाऊन

ऑगष्‍ट महिन्‍यातील येणाऱ्या सर्व रविवारी पुढील अत्‍यावश्‍यक बाबी व सेवा मर्यादित स्‍वरुपात व निर्बधांसह सुरु राहतील.तसेच संचारबंदीच्या आदेशाचे पालन करतांना कुठल्याही व्यक्ती, नागरिंकांना हालचाल करण्याकरीता व मुक्‍त संचार करण्‍याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत प्रत्‍येक शनिवारचे सायंकाळी सात वाजेपासून ते सोमवारचे सकाळी नऊ वाजेपर्यंत सक्त मनाई करण्यात येत आहे.

दुध विक्री, दुधाचे घरपोच वितरण सकाळी ६ ते ९ व सायं. ५ ते ७ अनुज्ञेय राहील, सर्व खाजगी व वैद्यकिय सेवा, पशुचिकित्‍सक सेवा, त्‍यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील, सर्व रुग्‍णालय व रुग्‍णालयाशी निगडीत सेवा त्‍यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. व कोणतेही रुग्‍णालय बंद आधार घेवून रुग्‍णांना आवश्‍यक सेवा नाकारणार नाही.,सर्व औषधीची दुकाने, पेट्रोलपंप १. मे. वजीफदार अॅन्‍ड सन्‍स, वसंत देसाई स्‍टेडीयम जवळ अकोला (२) मे. एम.आर. वजीफदार अॅन्‍ड कं. आळशी प्‍लॉट अकोला (३) मे. केबीको अॅटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला (४) औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रामधील (५) मे. न्‍यु  अलंकार सर्वो, वाशिम बायपास अकोला  हे सकाळी ९.००  ते दुपारी १२.०० या कालावधीत अत्‍यावश्‍यक सेवेकरिता सुरु राहतील, प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये एक पेट्रोलपंपसुरु राहतील या बाबत उपविभागीय अधिकारी यांनी स्‍वतंत्र आदेश निर्गमित करावेत, राष्‍ट्रीय व राज्‍य महामार्गावरील पेट्रोलपंप सुरु राहतील, वर्तमान पत्राचे वितरण नियमित सुरु राहतील, यापूर्वी ज्‍या शासकीय कामांना सुट देण्‍यात आली आहे अशी कामे.

कोविड-१९ चे संदर्भाने  इतर आवश्‍यक सूचना

सर्व प्रकारच्या सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य राहील. अन्यथा याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, पोलीस विभागांनी दंडात्मक कारवाई करावी. सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्‍थळी,वाहतूकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर (Social Distancing ) च्या नियमांचे पालन करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती त्यांचेमध्ये कमीत कमी ६ फुटाचे अंतर राखतील तसेच दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदी करतेवेळी दुकानदार यांनी दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त जास्त लोक एकत्रीत येणार नाही याची दक्षता घ्यावी व तसे  आढळून  न आल्यास याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, पोलीस विभागांनी दंडात्मक कारवाई करावी. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम, मेळांवे, सभा आयोजित करुं नये.  सार्वजनिक स्‍थळी (रस्ते, बाजार, रुग्‍णालय, कार्यालये इ. ) ठिकाणी थुंकत असल्याचे आढळूंन आल्यास संबंधीत विभागाने कारवाई करावी. दारु.पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ यांचा सार्वजनिक ठिकाणी वापर व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद राहतील. या कालावधीत जास्तीत जास्त लोकांना घरुन  काम करण्याची (Work from Home ) मुभा राहील .त्याकरीता कार्यालय, दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणीज्यिक आस्थापना यांनी त्यांचे कामाच्या वेळां त्या प्रमाणे निश्चित कराव्या. सर्व सार्वजनिक ठिकाणी आत यावयाच्या व बाहेर जावयाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनींग, हॅन्ड वॉश, सॅनीटायझर, इ. ची व्यवस्था करण्यात यावी. सर्व प्रकारच्या कार्यालये/दुकाने/आस्थापना येथील कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनींग, हॅन्ड वॉश, व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. सर्व कामाच्या ठिकाणी काम करतांना सोशल डिस्टंसींगचे नियमांचे पालन करण्यात यावे. कामगार/कर्मचारी यांच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, कामाच्या वेळां बदलतांना दोन शिप्‍फ्ट मध्ये अंतर ठेवण, दुपारच्या जेवणाच्या वेळामध्‍ये अंतर ठेवण्यात यावे.

प्रतिबंधात्मक क्षेत्राकरीता खालील मार्गदर्शक सूचना लागू राहतील

ज्या ठिकाणी कोविड-१९ या साथीच्या रोगाचा मोठया प्रमाणात उद्रेक झाला आहे असे क्षेत्र किंवा असे क्लस्टर (Containment Zone ) या ठिकाणी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित आयुक्त/सक्षम प्राधिकारी यांनी सिमांकन करुंन प्रवेशास प्रतिबंध करण्यात यावा. अशा  Containment Zone व Buffer Zone  मध्ये मार्गदर्शक सूचनांनुसार संचारबंदी कालावधी मध्ये अत्याश्यक व मुलभूत सेवा यांना देण्यात आलेली सूट लागू राहणार नाही. तसेच इतर परवानगी देण्यात आलेल्या बाबी सुध्दा प्रतिबंधीत राहतील. अशा Containment Zone व Buffer Zone मध्ये कडक नियंत्रण ठेवण्यात यावे तसेच अशा परिसरामध्ये आपत्कालीन अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय सेवा, कायदा व सुव्यस्थेची निगडित सेवा) वगळंता इतर कोणतीही व्यक्ती यांना   Containment Zone मध्ये आंत किंवा बाहेर तपासणी केल्याशिवाय सोडू नये. या आदेशामध्ये दिलेल्या दिशानिर्देशाव्यतिरिक्त  Containment Zone व Buffer Zone करीता आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. रात्रीची संचारबंदी –संचारबंदीच्या आदेशाचे पालन करतांना कुठल्याही व्यक्ती, नागरिंकांना हालचाल करण्याकरीता व मुक्‍त संचार करण्‍याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत  सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त मनाई करण्यात येत आहे.

संचारबंदीच्या कालावधीत खालील सेवा प्रतिबंधीत

  1. सर्व प्रकारची शाळां, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, हे बंद राहतील.तथापी ऑनलाईन/ आंतर शिक्षण यांस मुभा राहील.
  2. सर्व प्रकारची सिनेमागृहे,व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाटयगृहे, बार (मद्यगृहे), व इतर संबंधित मनोरंजनाची ठिकाणे ही बंद राहतील.
  3. सर्व प्रकारची सामाजिक/राजकीय मेळावे, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील.
  4. सर्व प्रकारची धार्मिक स्थळें/धार्मिक पुजा स्थळें हे सर्व नागरिकांसाठी संचारबंदीच्या कालावधीत बंद राहतील.

विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती अणि वस्तुंची हालचाल करण्याकरीता दिशानिर्देश

  1. राज्यअंतर्गत व राज्यबाहेरील सर्व प्रकारची वैद्यकीय व्यावसायीक, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, सफाई कर्मचारी, रुंग्णवाहीका यांच्या हालचाली हया कुठल्याही निर्बंधाशिवाय सुरु राहतील.
  2. राज्याअंतर्गत व जिल्हयाअंतर्गत असलेली सर्व प्रकारची मालवाहतूक सुरु राहील. लॉकडाऊनच्या काळांत अडकलेले मजुर, स्थलांतरीत कामगार, यात्रेकरुं, पर्यटक यांना दिलेल्या दिशानिर्देशानुसार परवानगी अनुज्ञेय राहील.
  3. आंतरराज्य, आंतरजिल्हा अंतर्गत असलेली सर्व प्रकारची मालवाहतूक (खाली ट्रक सह) ही कुठल्याही प्राधिकारी यांनी प्रतिबंधीत करु नये.

आरोग्य सेतू वापराबाबत.

कोरोना प्रार्दुभाव रोखण्याकरीता आरोग्य सेतु अ‍ॅप हे संभाव्य धोका तात्काळओळखण्याचे कार्य करीत असल्याने व्यक्तीगत व समुह संरक्षण करण्याकरीता आरोग्य सेतू अ‍ॅप हे अत्यंत उपयुक्त आहे.  सर्व शासकीय कार्यालयामध्ये कोरोना विषाणू पासून संरक्षण होण्याकरीता सर्व कर्मचारी यांनी सुसंगत असलेल्या त्यांचे मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप वापरण्याबाबत सूचना देण्यात याव्या.

बँकींग सेवा

             अकोला  शहर व ग्रामीण जिल्हयातील कार्यरत असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत सरकारी बँक, खाजगी बँक, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था हया त्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत सुरु  राहतील.

             या संचारबंदीमध्ये अकोला  शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील या आदेशाचा  भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल

            सदरचे संचारबंदीचे आदेश 31 ऑगस्टचे मध्‍यरात्रीपर्यंत संपूर्ण अकोला  शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले आहे.

Tags: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरजिल्ह्यात संचारबंदी
Previous Post

जून-जुलैमध्ये गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस!

Next Post

बोर्डीचे पोलिस पाटील विरुध्द निलंबनाचा अहवाल सादर……

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
akot tahsil

बोर्डीचे पोलिस पाटील विरुध्द निलंबनाचा अहवाल सादर......

जिल्हाधिकारी शैलेश नवाल

31 ऑगस्टपर्यंत अमरावती जिल्ह्यात संचारबंदी; यापूर्वीची स्थिती कायम जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.