अकोला : मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस सरासरीच्या लगत पोहोचला असून, ही समाधानकारक स्थिती मानली जात आहे. चांगल्या पावसामुळे यावर्षी पिकांची स्थिती चांगली आहे; परंतु पावसाचे वितरण मात्र असमान आहे. यावर्षी जूनमध्ये सरासरी ९२.४ मिमी तर जुलैै महिन्यात ९३.४ मिमी पाऊस पडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त आहे. गतवर्षी जूनमध्ये केवळ ६०.१४ मिमी आणि जुलैमध्ये ८८.६ मिमी पाऊस होता. त्यामुळे यावर्षी चांगल्या पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम असली तरी किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात सरासरी १३६.९ पावसाची गरज होती. प्रत्यक्षात ७८.४ मिमी म्हणजेच ५७.३ टक्केपाऊस पडला होता. हा पाऊस जवळपास ४३ टक्के कमी होता. यावर्षी जून महिन्यात पावसाची सरासरी १३६.९ मिमी आहे. प्रत्यक्षात १२६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे यावर्षी मागच्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ९२ टक्के पाऊस पडला आहे. मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात सरासरी २२३.२ मिमी पावसाची गरज होती. प्रत्यक्षात १९७.८ मिमी ८८.६ टक्के पाऊस झाला. केवळ १२ टक्के कमी नोंद झाली. यावर्षीच्या जुलै महिन्यात सरासरी २२३.२ मिमी पावसाची गरज होती. प्रत्यक्षात २०६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ९३ टक्के असून, केवळ ७ टक्के कमी आहे.
जिल्हाभरात एकाच वेळी सार्वत्रिक पाऊस पडला नसला तरी, पावसाने सर्वच तालुक्यात गाठलेली सरासरी पिकांसाठी पोषक ठरली आहे. पिकांवर आलेली कीड विशेषत: कपाशीवरील गुलाबी बोंड अळी, चक्रीभुंगाचे संकट आले आहे तर आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा तालुक्यासह विदर्भातील अनेक भागात मूग पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे मूग लागवड शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काही शेतकºयांनी मूग पिकावर नांगर फिरवून शेतातलं पीक उद्ध्वस्त करण्याचा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तेल्हारा, बाळापूर तालुक्यात जाऊन मूग पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मूग पिकाचे काही नमुने संकलीत करून ते तपासणीसाठी बँगलोर येथील व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठविल्याच
पाणीटंचाई नाही?
जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत झालेला समाधानकारक पाऊस आणि पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये पुरेसा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत कुठेही पाणीटंचाईची परिस्थिती नाही. उन्हाळ्यापर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची चिन्हे नाहीत असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे म्हणाले.
दुबार पेरणीचे संकट
बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. महाबीजने या बियाण्यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतकºयांचे संपूर्ण नियोजनच बोगस सोयाबीन बियाण्यांनी कोलमोडून टाकले आहे.
आज काटेपूर्णाचे ४ गेट उघडणार; १५० क्युसेक विसर्ग
अकोला काटेपूर्णा धरणात ८५ टक्के जलसंचय झाल्याने उद्या १ आॅगस्ट रोजी चार गेट उघडण्याचा निर्णय पाटबंघारे विभागाने घेतला आहे. या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता दोन गेट उघडले जाणार असून, दोन गेट दुपारी १ वाजता उघडण्यात येणार आहेत.यामधून १५० क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.
काटेपूर्णा धरणात यावर्षी ८५ टक्के जलसंचय झाल्याने या धरणांतर्गत शेतीला यावर्षी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. वान धरणात यावर्षी आतापर्यंत केवळ ४१ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. आॅगस्ट महिन्यात हे धरण भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर वान धरणाचा निर्णय घेण्यात येईल.
-चिन्मय वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग