अकोला (प्रतिनिधी)- अकोला येथील शहर वाहतूक शाखेने शहर वाहतूक शाखेची स्थापना झाल्या पासून सर्वोच्च कारवाया तर केल्याचं पण 1 जानेवारी ते 25 जुलै पर्यंत अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता अकोला शहर वाहतूक शाखा आघाडीवर असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे, प्राप्त आकडेवारी नुसार अमरावती विभागातील फक्त वाहतूक शाखेने केलेल्या 1 जानेवारी ते 25 जुलै पर्यंतच्या केलेल्या दंडात्मककारवाया पाहता अकोला शहर वाहतूक शाखा एकूण 45,156, बुलडाणा 16,710, वाशिम 19,741, यवतमाळ 30,552, अमरावती 38,736 अश्या दंडात्मक कारवाया केल्याचे दिसून येते, अकोला सोडला तर इतर ठिकाणी जिल्हा वाहतूक शाखा कार्यान्वित आहे म्हणजेच त्यांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण जिल्हा असते, अकोला येथे शहर वाहतूक शाखा असल्याने त्यांनी सदर कारवाया ह्या शहरातच केलेल्या आहेत हे विशेष, मागील दीड वर्षा पासून दंडात्मक कारवाया ह्या इ चालान मशीन द्वारे करण्यात येतात त्याची आकडेवारी पाहता अकोला शहर वाहतूक विभागाकडे उपलब्ध इ चालान मशीन ची संख्या आहे 26, बुलडाणा जिल्हा वाहतूक शाखे कडे 09, वाशिम जिल्हा वाहतूक शाखेकडे 07, यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखे कडे 50, अमरावती जिल्हा वाहतूक शाखेकडे 28 अश्या प्रकारे इ चालान मशीन कारवाई साठी उपलब्ध आहेत
तसेच लॉक डाऊन च्या कालावधी मध्ये शहर वाहतूक विभागाने वेळोवेळी धडक मोहिमा राबवून नियमांचा भंग करणारी एकूण 2860 वाहने जप्त केली होती व जिल्हाधिकारी ह्यांचे आदेशाचा भंग करून वाहन चालविल्याने शहर वाहतूक शाखेने एकूण 58 गुन्हे शहराच्या विविध पोलीस स्टेशनला दाखल करून त्या मध्ये 1145 वाहने जप्त सुद्धा करण्यात आली होती
ह्यातील बहुसंख्य कारवाया ह्या लॉक डाऊन च्या काळात झालेल्या असून तत्कालीन पोलीस अधीक्षक अमोघ गावकर व पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने धडक मोहीम राबवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहांचालकांवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत
गजानन शेळके शहर वाहतूक पोलीस निरीक्षक