अकोला,दि.30- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 582 चाचण्यामध्ये 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात आज येथे 102 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोट येथे 59 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बाळापूर येथे चाचण्या झाल्या नाहीत. बार्शीटाकळी येथे 69 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. पातूर येथे 41 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तेल्हारा येथे 87 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर येथे 103 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच अकोला मनपामध्ये 93 चाचण्या झाल्या त्यात पाच पॉझिटिव्ह आले आहे, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 18 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 10 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे एकूण 582 चाचण्या होऊन त्यात 29 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 6951 चाचण्या झाल्या असून 353 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.