तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक सेठ बन्सीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आज दिनांक 29/07/2020 रोज बुधवार ला सकाळी 10.30 वाजता संस्थेच्या सेठ बन्सीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, सेठ बन्सीधर प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व ज्युनिअर कॉलेज (इंग्रजी माध्यम) या तिन्ही विभाग तर्फे स्व. सेठ बन्सीधरजी झुनझुनवाला यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री बेनीप्रसादजी झुनझुनवाला तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष श्री.विलासराव जोशी व्यवस्थापक गोपालदासजी मल्ल कोषाध्यक्ष श्री.विठ्ठलराव खारोडे संचालक सौ.अश्विनीताई विठ्ठलराव खारोडे श्री.विष्णु मल्ल व सेठ बन्सीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्रकुमार देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सरस्वती , स्व. सेठ बन्सीधर जी झुनझुनवाला पूजन करून झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य श्री राजेंद्रकुमार देशमुख यांनी केले. तर स्व.बन्सीधरजी झुनझुनवाला यांच्या जीवनावर संस्थेचे अध्यक्ष श्री बेनीप्रसादजी झुनझुनवाला यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. सोबतच त्यांनी संस्थेचा १०० वर्षाचा गौरव शाली इतिहास विशद केला. त्याचप्रमाणे संस्थेचे कोषाध्यक्ष श्री विठ्ठलराव खारोडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सविस्तर मांडला. स्व. बंसिधरजी झुनझुनवाला यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कर्मचारी व बांधकाम मजुरांना विनामूल्य मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्री मुकुंद सोनीकर यांनी केले सोशल डिस्टंसिंग चे पालन करत तिन्ही विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले.