तेल्हारा (प्रतिनिधी)- इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी अमरावती बोर्डाने ऑनलाइन घोषित केला आहे स्थानिक सेठ बन्सीधर विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी विद्यालयाचा 95.85 % निकाल लागला आहे. यामध्ये 362 विद्यार्थ्यांपैकी 347 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये प्राविण्य श्रेणी 179 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 102 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 44 विद्यार्थी तृतीय श्रेणीत 22 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यालयामधून प्रथम क्रमांक कु. गायत्री गजाननराव अरबट व कु. समृद्धी गजानन राऊत 98.20 % द्वितीय क्रमांक कु. वेदिका श्रीकृष्ण रत्नपारखी 97.60% तृतीय क्रमांक कु. सानिका प्रल्हाद यादगिरे 97.40% चतुर्थ क्रमांक कु. अनुजा काशिनाथ नेमाडे 96.80% आणि पाचवा क्रमांक कु. प्रतीक्षा सतीश ढोले 96.40% यांनी गुण संपादन केले आहे. ऑनलाईन निकाल घोषित होताच सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री बेनीप्रसादजी झुनझुनवाला उपाध्यक्ष श्री. विलासराव जोशी व्यवस्थापक श्री. गोपालदासजी मल्ल कोषाध्यक्ष विठ्ठलराव खारोडे संचालक श्री राजेंद्रजी शाह श्री पुष्करभाऊ तागडे सौ.अश्विनीताई विठ्ठलराव खारोडे श्री.अभिजीत शाह श्री.विष्णू मल्ल डॉ.श्री. विक्रम जोशी श्री. शिवम पाडीया मुख्याध्यापक श्री.राजेंद्रकुमार देशमुख तसेच सेठ बन्सीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले सर्व विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद दिले व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.