कोरोना अलर्ट
आज बुधवार दि. २९ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- १२७
पॉझिटीव्ह- १९
निगेटीव्ह- १०८
अतिरिक्त माहिती
आज सकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व १० पुरुष आहेत. त्यातील अकोट येथील १५ जण तर उर्वरित दगडीपूल, बांबुळगाव, पांढरी व राणेगाव तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात ६० वर्षीय महिला असून त्या हिवरखेड, तेल्हारा येथील रहिवासी आहे. त्यांना दि. १५ जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २२१५+३००=२५१५
मयत-१०४, डिस्चार्ज- २०३१
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८०
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!