• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बॅकांनी पिक विमा प्रकरणे 31 जुलैपूर्वी पूर्ण करावी

Team by Team
July 29, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
77 1
0
पीक विमा योजना
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 करिता शेतकऱ्यांकडून पिक विमा अर्ज जमा केले जात आहेत. तथापि बँका बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारत नसल्यामुळे शेतकरी/लोकप्रतिनिधींच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बिगर कर्जदार शेतकऱ्यांचेही पिक विमा अर्ज व हप्ते स्विकारणे बॅंकांना बंधनकारक असून बॅंकांनी हे अर्ज स्विकारावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बँक अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्याची मुदत 31 जुलै 2020 असून शेतकऱ्यांनी आपल्या बॅंकेत हे अर्ज व हप्त्याची रक्कम जमा करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

आज नियोजन भवनात बँक अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणीया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक निकम, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक वाळके, सहकारी संस्थेचे उपनिबंधक श्रीकांत खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आतापर्यंत 1 लाख 42 हजार 500 प्रकरणापैकी 79 हजार 838 खरीप पिक विमा प्रकरणे झाली असून उर्वरित प्रकरणे 31 जुलै पूर्वी पूर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत 85 हजार 112 शेतकऱ्यांपैकी 46 हजार 621 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्त करण्यात येईल.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

जिल्हा उद्योग केन्द्राच्या पालकमंत्री उद्यमी ग्राम योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील उद्योगाला चालणा देण्यासाठी व ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी आपले गाव, आपले उत्पादन व आपले मार्कट या दृष्टिकोणातून छोटेछोटे उद्योग ग्रामीण भागात सुरु करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे व प्रशिक्षण पूर्ण झाल्याना त्यांचे प्रकरणे पूर्ण करुन बँकेकडे सिफारस करण्यासाठी प्रस्तावित केले असल्याची माहिती जिल्हा उद्योग केन्द्राचे व्यवस्थापक निकम यांनी दिली. हातमाग, मधमाशा पालन, अगरबत्ती, गॉरमेंट उद्योग, दुग्ध प्रक्रीया उद्योग, सोलरवरील चरखाव्दारे सूत काढणे, खराटा व झाडू उद्योग आदि प्रकरणाचा समावेश असून बँकेव्दारे या प्रकारणाचा कर्ज देण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी व हा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

प्रधानमंत्री पिक विमा योजनाबाबत अडचणी असल्यास शेतकऱ्यांसाठी संपर्क क्रमांक
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी विमा कंपनी म्हणून एचडिएफसी इरगो इन्सूरन्स या विमा कंपणीला तीन वर्षासाठी नियुक्त केले आहे. या कंपणीचे संपर्क अधिकारी प्रत्येक तालुक्यात नेमले असून त्याचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे. संजय निपाणे, जिल्हा व्यवस्थापक संपर्क क्रमांक 7057502870, महादेव जगताप अकोट ब्लाँक व्यवस्थापक संपर्क क्रमांक 9423486699, अभिषेक रानडे, बाळापूर ब्लाँक व्यवस्थापक संपर्क क्रमांक 8237461040, नरेन्द्र बाहकर बार्शिटाकळी ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 9766558561, शुभम हरणे, मुर्तिजापूर ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 8975883826, धिरज कोहार, पातूर ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 9552624966, प्रफुल मानकर, तेल्हारा ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 9689761512 असे आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा अर्ज व हप्ता भरण्यात अडचण येता कामा नये,याची दक्षता घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले.

Tags: पिक विमापिक विमा अर्जसंपर्क क्रमांक
Previous Post

कोविड नियंत्रण कक्षासाठी नविन संपर्क क्रमांक

Next Post

कोरोनाची लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
केन्द्रे

कोरोनाची लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

Result

राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के, यंदाही मुलींची बाजी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.