अकोला – सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील शासन निर्णय दि. 23 मे 2020 अन्वये कोविड-19 महामारीच्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा यासाठी मर्यादित कालावधीसाठी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. योजनेच्या अंतर्गत 31 जुलै पर्यंत शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटूंबाचा समावेश करण्यात आला आहे.
जर रुग्ण किवा त्याचा नातेवाईक कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड सादर करु शकत नसल्यास अशा नागरिकांना तहसिलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करावे लागेल. दाखला प्राप्त होताच त्या कुटूंबाची नोंदणी करुन योजनेचा लाभ देता येईल. लाभार्थ्याने अधिवास प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यास घोषणापत्र सादर करावे लागेल. तहसिलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही कागदपत्र योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरणात येणार आहे. सदर नमुने जीवनदायी योजनेच्या www.jeevandayee.gov.in संकेतस्थळावर ऑपरेशन गॉईडलाईन्स अंतर्गंत Declaration and Tahsildar Certificate या लिंकवर उपलब्ध करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बि.यु. काळे यांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक तहसिल कार्यालयासी संपर्क साधावा.