अकोला -आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 211 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 202 अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2488(2196+292) झाली आहे. आज दिवसभरात 21 रुग्ण बरे झाले. आता 354 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 18902 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 18355, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 380 नमुने होते. आजपर्यंत एकूण 18731 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 16535 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2488(2196+292) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज नऊ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीनही पुरुष आहेत. त्यातील दोन जण कापशी रोड ता.अकोला व पातूर येथील एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व पाच पुरुष आहेत. त्यात बाबुळगाव येथील दोन जण, बोरगाव मंजू, धोतर्डी, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
21 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 10 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून तीन जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून चार जणांना तर आयकॉन हॉस्पीटल येथून चार जणांना अशा एकूण 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात 54 वर्षीय महिला असून त्या कवासा दहिहांडा, अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना दि. 8 जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
354 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2488(2196+292) आहे. त्यातील जण 103 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 2031 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 354 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.