अकोट (देवानंद खिरकर )- शेतकऱ्याच्या हितासाठी आमदार रणधीर सावरकरांनी घेतली बैठक महाराष्ट्र नाकामी सरकार शेतकऱ्यांनकडे दुर्लक्ष करत आहे.हे लक्षात घेता शेतकऱ्यांनचे नेते मा केंद्रीय मंत्री संजुभाऊ धोत्रे यांना शेतकऱ्यांनि युरिया संदर्भात अडचणी होत आहेत. हायब्रीड ला विविध पिकांना खते देने आवश्यक आहे.हे सांगितले महाराष्ट्र भर हाल होत आहेत.ही समस्या मा आमदार रणधीर सावरकर यांनी संजुभाऊ धोत्रे मार्फत विविध खते कंपन्या सोबत चर्चा केली व ताबडतोब 2 दिवसात युरिया व विविध खते न पाठविल्यास तुमच्या कंपनीवर कार्यवाही करण्याचे खडसावले तसेच,शेतकरी वर्गाला जंगली जनावरे याचा त्रास वाढला आहे त्या संदर्भात तक्रारी ह्या कुटासा गावात जाऊन स्वीकार करा असे आदेश अधिकारी बावणे साहेबाना सांगितले.यावेळी तहसीलदार गिते,फ़ोरस्टचे अजय बावणे, विजुभाऊ सोळंके,राजाभाऊ नागमते,मोहन सावरकर,प्रवीण पाटील डीक्कर, मंगेश ताडे, संतोष शिवरकर,किशोर बुले,गोपाल पेटे, स्वप्नील बुटे,विठल वाकोडे,आदि लोकांची उपस्थिती होती