अकोला,दि.24-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 110 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 77 अहवाल निगेटीव्ह तर 33 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2334(2111+223) झाली आहे. आज दिवसभरात 50 रुग्ण बरे झाले. आता 329 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्याअधिष्ठाता यांच्या अहवालानुसार अकोला जिल्हा व्यतिरिक्त अन्न जिल्हयातील पॉझिटिव्ह व मयत व्यक्तींची तसेच आत्महत्या केलेल्या एका व्यक्तीची नोंद अहवालातून वगळण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 17476 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 16961, फेरतपासणीचे 164 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 351 नमुने होते. आजपर्यंत एकूण 17366 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 15255 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2334(2111+223) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 33 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व 19 पुरुष आहेत. त्यातील 15 जण सेंट्रल जेल येथील, तीन जण रामदासपेठ येथील, अडगाव !ब्रु!!, कुटासा, जूने शहर व खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच सायंकाळी 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात चार महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तीन जण महान येथील, मोठी उमरी, लोटनपूर व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण तर वाडेगाव व जेल क्वॉटर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
50 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अकोट येथील तिन तसेच अटाळी खामगाव, खामगाव, मुर्तिजापूर, पातूर, खदान, सिंधी कॅम्प व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक अशा एकूण 10 जणांना घरी पाठविण्यात आले, कोविड केअर सेंटर अकोला येथून 29 जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून नऊ जणांना अशा एकूण 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात 62 वर्षीय पुरुष असून बारामीखुर्द, मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. त्यांना दि. 20 जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
329 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूणपॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2334(2111+223) आहे. त्यातील जण 99 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 1906 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 329 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.