हिवरखेड(धीरज बजाज)– हिवरखेड येथे आज 23 जुलै गुरूवार रोजी झालेल्या कोरोना रॅपिड एंटीजन टेस्ट मध्ये मध्ये एकूण 50 जणांची तपासणी करण्यात आली त्यामधून 43 टेस्ट निगेटिव्ह आल्या तर 7 नवीन कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळले.
आजचे सात नवीन रुग्ण पैकी 4 रुग्ण वार्ड क्र. चार ह्या परिसरातील असून तीन रुग्ण वॉर्ड क्र. 6 मधील रहिवासी आहेत. आजच्या पॉझिटिव रुग्णांमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे त्यामध्ये एक सात वर्षीय लहान मुलाचा सुद्धा समावेश आहे. आता हिवरखेड येथील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 17 झाली आहे. उपरोक्त माहिती वैद्यकीय अधिकारी आरोग्यवर्धिनी केंद्र हिवरखेड आणि ग्रामपंचायत हिवरखेड कडून मिळाली आहे.