कोविड मुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला दलातील कर्तव्यदक्ष ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी सुखरूप घरी पोहोचविले.फड यांनी दाखविलेली माणुसकी & कार्यतत्परता कौतुकास्पद आहे.अस tweet राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या tweeter वरून tweet केलय.
अकोट शहरातील एका खाजगी हॉस्पीटल मध्ये काम करून घराकडे परत जात असलेल्या युवती अडकुन पडली होती. घरी जाण्यासाठी मदतीचे आशेवर असलेली ही युवती अकोट ग्रामिण पोलीस स्टेशन समोर उभी असल्याचे ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना दिसली.त्या युवतीची व्यथा ऐकल्यावर संध्याकाळीची वेळ असल्याने तात्काळ पोलीसांच्या गाडीने तीला आकोलखेड गावी घरी सुखरुप पोहचविण्यात आले.
त्यामुळे युवती व तिचे कंटुब, गावकऱ्यांनी पोलीसाचे कामाचे कौतुक केले. केवळ दंडुके, दंडात्मक कारवाया नाही तर खाकीमध्ये सुध्दा ज्ञानोबा फड सारखे माणुसकी जपत असुन संकटकाळातील समाजाकरीता पोलीस कटीबध्द असल्याचे अनुभवता आहे.
असाह्य संकटातील मुलीला घरपोच सुरक्षित पोहचविल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आल्यानंतर अकोला पोलीस या tweeter वर आज टाकण्यात आल्या होत्या त्यामुळे राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बातमीची दखल घेत अकोट ठाणेदार याचं कौतुक केलंय…