तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यात युरीया खताचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला असुन तालुक्यातील शेतकऱ्यांना अतोनात गैरसोयींना समोर जावं लागत आहे.या युरियाच्या तुडवड्या संदर्भात तेल्हारा युवक काँग्रेसच्यावतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तेल्हारा तहसीलदार यांच्यामार्फत एक निवेदन देण्यात आले.तेल्हारा तालुक्यातील शेतकरी युरीया खतांसाठी भटकंती करत असुन तालुका खरेदी विक्रीमार्फत शेतकऱ्यांना वेळेवर युरिया उपलब्ध करुन न दिल्याने आजरोजी शेतकऱ्यांना या संकटांना सामोरे जाव लागत आहे.शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे या कोरोना संकटात शेतकरी हा एकमेव असा घटक आहे जो जनतेला अहोरात्र धान्य व भाजीपाला पुरवत आहे.काही क्रुषी सेवा केंद्र शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याने जर या युरीया टंचाईमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झाले तर याला कोण जबाबदार समजावे असा सवाल सबंधित निवेदनाद्वारे विचारला गेला आहे.जर येत्या दहा दिवसात युरियाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर भारतीय काँग्रेस आणि भारतीय युवक काँग्रेस तर्फे आंदोलन केल्या जाईल असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर नितीन वाकोडे जिल्हा सचिव युवक काँग्रेस, परमेश्वर इंगळे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख अकोला, सोनु मलिये भारतीय काँग्रेस तेल्हारा तालुकाध्यक्ष,अन्सार पटेल जिल्हा सदस्य भारतीय काँग्रेस,संदिप देशमुख तेल्हारा तालुकाअध्यक्ष युवक काँग्रेस,अनंता सोनमाळे युवक काँग्रेस तेल्हारा शहराध्यक्ष, योगेश जुंबळे तालुका सरचिटणीस आणि खलील शहा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.