अकोट (शिवा मगर)- शहरामध्ये कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव असतानाही नागरिकांचे मास्क बाधण्या पासून दुर्लक्ष तसेच अकोला जिल्ह्यामध्ये आजपासून तीन दिवसाचा कडकडीत लॉक डाऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घोषित करण्यात आलेला आहे
अकोट अंजनगाव रोड वरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर तसेच शिवाजी चौक अकोला नाका हिवरखेड रोड सोनू चौक ठीक ठिकाणी नगरपालिका कर्मचारी व अकोट जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक त्यांच्यासोबत पोलिस कर्मचाऱ्यांचा नागरिकांवर कडकडीत बंदोबस्त व दंडनीय कारवाई करण्यात येत आहे तरीही काही नागरिक नियमाचे पालन न करत असल्याचे दिसून येत आहे म्हणून पोलीस कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी यांनी धडक दंडनीय कारवाई करण्याची मोहीम चालू केली आहे सदर इसमास सांगूनही न ऐकलेल्याणे श्री ठाकूर साहेब अकोट पोलीस कर्मचारी यांनी आपल्या स्वतःच्या हाताने एका दुचाकी चालकाला रुमाल बांधून दिला व त्यांचे कर्तव्य पार पाडले