मूर्तिजापूर (सुमित सोनोने):- मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीला विद्यमान सरपंचा ऐवजी गावातीलच व्यक्तीला प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा आदेश रद्द करणेबाबत मा.उपविभागीय अधिकारी ,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी अकोला यांना भाजपा मूर्तिजापूर तर्फे निवेदन देण्यात आले.कोरोना महामारीच्या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पुढील निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्या ऐवजी सरकारने आता ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि विशेष म्हणजे हा प्रशासक संबंधित गावातीलच कोणीतरी व्यक्ती असणार आहे. विशेष म्हणजे हे प्रशशक पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार आहेत. साहजिकच आपल्या मर्जीतील व्यक्ती प्रशासक म्हणून नियुक करण्यात येईल त्यामुळे लोकशाही व्यवस्थेला सुद्धा आवाहन निर्माण केले जाणार असून, लोकशाहिवरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी आपले जीव धोक्यात घालून गावाची सेवा केली त्यांना कुणीही विचारनार नाही व ज्यांनी काहीही योगदान दिले नाही त्यांची नेमणूक प्रशासक म्हणून झाल्यास त्यांचेकडून काही चांगले होण्याची अपेक्षा ती काय?यावर विद्यमान सरपंच नाराज असून कोरोना सारख्या महामारीच्या काळात पुढारी मात्र आप आपल्या मर्जीतले प्रशासक नेमण्याची फिल्डिंग लावत आहेत. तेव्हा विद्यमान व अनुभवि सरपंचांना न डावलता त्यांनाच मुदतवाढ देण्यात यावी असे निवेदन मा.आमदार हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.यावेळी भुषण कोकाटे भाजपा तालुकाध्यक्ष मूर्तिजापूर, रितेश सबाजकर भाजपा शहराध्यक्ष मूर्तिजापूर,यावेळी सतिशचंद्र शर्मा अध्यक्ष भाजपा जिल्हा व्यापारी आघाडी,सचिनबाप्पू देशमुख युवामोर्चा जिल्हाध्यक्ष,हर्षल साबळे, पप्पू पाटील मुळे, गजानन नाकट, राम जोशी, प्रशांत पंत,अविनाश साबळे, अविनाश यावले, राजेश कांबे, राहुल गुल्हाने, राम गागणानी राजेंद्र इंगोले, निलेश वानखडे, लखन अरोरा, यशवंत आळेकर, विलास सावळे, ऋषिकेश वारे, निलेश वाळवे, यांची उपस्थिती होती. अनिल पाटील ठोकळ, ऍड अविन अग्रवाल, अमित नागवान, राहुल वानखडे, राजश्रीताई बोलके, छोटू मानकर, अमोल पिंपळे, देवानंद लबडे, अभय पांडे, निलेश वाडवे,यांची उपस्थिती होती.