अकोट (देवानंद खिरकर )- अकोट ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहीती मिळाली की धारणी ते अकोट जंगल मार्गाने कत्तली करिता गोवंशीय प्राणी आणणार आहेत.अशा गोपनीय माहीती वरुन धारणी पोपटखेड रोडवरील रुधाळी फाट्यावर पोलिस स्टॉप व पंचासह नाकाबंदी केली असता,पोपटखेड फ़ोरस्ट चेक पोस्ट कडून एक मालवाहु येतांना दिसले सदरचे वाहन क्र टाटा 407 क्र.एम एच 29 टी 4364 थांबवले असता वाहन चालक पळून गेला त्याचा पाठलाग केला असता त्याचे नाव शेख इसाक शेख अशरफ वय 40 वर्ष राहणार मोहाळा हा असल्याचे आमच्या लक्षात आले.त्यांच्या वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता 11 गोवंश जातीचे प्राणी निर्दयतेने पाय व तोंड बांधून कोंबून कत्तल करण्याच्या ऊद्देशाने ठेवल्याचे मिळुन आले.त्यापैकी 2 गोवंश मृत अवस्थेत मिळुन आले.मृत 2 गोवंश प्राण्यांचे पिएम करुन दफन विधी करण्यात आला.
घटनास्थळावरुन 11 गोवंश जातीचे प्राणी (2 गोवंश प्राणी मृत)किंमत 1,24,000 रुपये मालवाहु वाहन किंमत 4,50,000 असा एकुण 5,74,000रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नमुद आरोपी विरुध्द पो.स्टे.अकोट ग्रामीण येथे अप.नं.228/2020 कलम 5(अ)9 महा.प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम 11(1)(ड)प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियम 1960 सहकलम 119 महा.पोलिस अधिनियम1951,अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस अधिक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलिस अधिक्षक श्री वाघुंडे साहेब,एस डी पी ओ सुनिल सोनवणे साहेब,यांचे मार्गदर्शनाखाली अकोट गचे ठाणेदार फड साहेब,वन विभागचे अवारे साहेब,पो उप निरिक्षक डाखोरे साहेब,कैलाश गोपनारायण,नंदकीशोर कुलट,रामेश्वर भगत,विलास अस्वार यांनी केली आहे.