तेल्हारा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी –मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात निकालात अमरावती विभागीय मंडळातील अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याचा निकाल ८४.९२ टक्के लागला आहे.
या परीक्षेसाठी तेल्हारा तालुक्यातून १८२३ नियमित विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते यात १५४४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. १२४ विद्यार्थी प्रविण्यप्राप्त व प्रथम श्रेणीत ५७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात तालुक्यातील १०० टक्के निकाल असलेल्या तळेगाव बाजार येथील डॉ.जगन्नाथ ढोणे कनिष्ठ महाविद्यालय, वरुड येथील स्व.ना.बिहाडे उच्च माध्यमिक विद्यालय व तेल्हारा मधील गुरुकुल ज्ञानपीठ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आहेत.
तालुक्यातील नूतन कनिष्ठ महाविद्यालय, बेलखेड -८३.७२, सेठ बन्सीधर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, तेल्हारा -९८.०३, गोपाळराव खेडकर महाविद्यालय, गाडेगाव(तेल्हारा) -७२.६१,जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय,हिवरखेड -८१.३९, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय,अडगाव-९८.६३, सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय, हिवरखेड -९२.३६, विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालय, भांबेरी- ६५.९०, स्व.बाबासाहेब खोटरे कनिष्ठ महाविद्यालय, सिरसोली-९२.००, डॉ.जगन्नाथ ढोणे कनिष्ठ महाविद्यालय, अडगाव- ९३.९३, नारायणदेवी शाह कनिष्ठ महाविद्यालय, हिवरखेड ९०.००, डॉ.जगन्नाथ ढोणे कनिष्ठ महाविद्यालय, तळेगाव बाजार -१००, अजहर फरखांदा उर्दू कनिष्ठ महाविद्यालय, घोडेगाव- ६७.७४, श्रीनाथ उच्च माध्यमिक विद्यालय, मनब्दा- ८६.९५, स्व.ना.बिहाडे उच्च माध्यमिक विद्यालय, वरुड-१००, युनुस अली कनिष्ठ महाविद्यालय,तेल्हारा-८१.६३,संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय, पाथर्डी ९४.६४, हनिफिया उच्च माध्यमिक, हिवरखेड-७६.१९. श्री अंबिकादेवी कनिष्ठ महाविद्यालय,सौंदळा – ९७.७२, गुरुकुल ज्ञानपीठ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,तेल्हारा-१००, मौलाना अब्दुल कलाम आझाद कनिष्ठ महाविद्यालय,हिवरखेड ७६.०८, रंगनाथ महाराज कनिष्ठ महाविद्यालय, चितलवाडी-९०.५४,नीलकंठ सपकाळ कनिष्ठ महाविद्यालय, पाथर्डी-१०० व डॉ.गो.खे.महाविद्यालय(एमसीव्हीसी),गाडेगाव(तेल्हारा)-५३.८४ टक्के निकाल आहे.