बाळापूर (प्रतिनिधी)- दि १५ जुलै रोजी सकाळी निमकर्दा ता.जी.अकोला येथील गावाजवळील तलावात एकजण बुडाल्याची माहिती उरळ पो.स्टेशन चे पि.आय. विलास पाटील साहेब यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली आणी लगेच सर्च ऑपरेशन साठी येण्याचे सांगितले.लगेच पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी ज्ञानेश्वर म्हसाये, अंकुश सदाफळे, सुरज ठाकुर, मयुर सळेदार, मनिष बुटे,पद्माकर मोरे,मयुर कळसकार, पंकज श्रीनाथ,ऋतीक सदाफळे, ऋषीकेश राखोंडे,दीपक गांजरे, सचिन बंड, यांना शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळी पाठवले. यावेळी या तलावा जवळील पुलावरुन दीपक सावळे अं.वय (32) रा.निमकर्दा हा आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान तलावात पडला यावेळी तो पाण्यातुन दोन वेळा बाहेर निघण्याच्या प्रयत्नात असतांना तलावाच्या खोल पाण्यात गेल्याने पाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती घटनास्थळी मीळाली यावरुन सर्च ऑपरेशन चालु केले असता घटनास्थळी 10-15 फुट खोल पाणी असल्याचे दिसून आले. लगेच सर्च ऑपरेशन चालु केले आणी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दीपक सावळे यांचा मृतदेह शोधुन बाहेर काढण्यात आमच्या जवानांना यश आल्याची माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे