बुलडाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालात अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे.
अमरावती विभागातील वाशिम जिल्हा ९४.०८ टक्के निकाल लागला आहे. तसेच यवतमाळ ९१.८५, अकोला ९०.८० तर अमरावती जिल्ह्याचा निकाल ९०.३१ टक्के लागला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातून एकूण ३१ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा फार्म भरले होते.त्यापैकी ३१ हजार १६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २९ हजार ३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्राविण्य श्रेणीत ४ हजार ६०१, प्रथम श्रेणीत १५ हजार २८ तर द्वितीय श्रेणीत ९ हजार ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.१८ टक्के, कला शाखा ९०.५५ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.४४ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा ८७.९६ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात बुलडाणा तालुक्याचा ९५.४७ टक्के , मोताळा तालुक्याची ९६.०१ टक्के, चिखली ९६.०१, देउळगाव राजा ९१.२५,सिंदखेडाराजा ९७.२३, लोणार ९४.८३, मेहकर ९६.०८, ,खामगाव ९२.४०,शेगाव ९२.०२,नांदुरा ९१.७३, मलकापूर ८८.१६, जळगाव जामोद ९६.०३ आणि संग्रामपूर तालुक्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे.