तेल्हारा (प्रतिनिधी)- संपूर्ण जगावर कोरोनाचे भयंकर संकट ओढवलेले आहे अशातच लॉक डाऊन मुळे सर्व शेतकरी बाधवासमवेत जनता आर्थिक अडचणीत सापडलेली आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून शिक्षण देण्यासाठी खाजगी कोचिंग क्लास विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी खाजगी कोचिंग क्लास मोबाइल सक्तीचे करत आहे त्या करीता युवसेनच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले
लॉक डाऊन मुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती समोर आली आहे . आपल्या तेल्हारा तालुकयातील प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे संचालक विद्यार्थ्यांना मोबाइल सक्तीचे करत असून त्यामुळे पालकांना अश्या आर्थिक अडचणीत सुध्या मोबाइल घेऊन देणे परवडणारे नाही . ऑनलाईन शिक्षण पद्धती ही फक्त पर्याय असून त्याची सक्ती करणे बंधनकारक नाहीत .परंतु आपल्या तेल्हारा शहरातील तालुक्यातील काही कोचिंग क्लासेस कडून विद्यार्थ्यांना मोबाइल सक्तीचे करण्यात असल्याची बाब काही पालकांनी युवासेना पदाधिकारी यांच्या कडे मांडली असता युवासेना पदाधिकारी यांनी गतशिक्षण अधिकारी यांना भेट घेऊन त्वरित मोबाइल सक्तीचे करणाऱ्या कोचिंग क्लास च्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे ही मागणी युवसेनच्या माध्यमातून करण्यात आली .अन्यथा युवासेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.यावेळी जिल्हा प्रवक्ता सचिन थाटे, युवासेना शहर प्रमुख राम वाकोडे ,सरचिटणीस सुरज देशमुख, किशोर डांबरे, शाम माहूरे ,प्रसाद देशमुख उपस्थित होते.