अकोला (प्रतिनिधी)- दि.11/8/2019 च्या शासन निर्णयानूसार महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायत कर्मचार्याचे अपघात विमा काढण्याचे आदेश असुन सर्व जिल्हा परिषदेंना तसे आदेश देण्यात आलेले आहे.परंतू आज परंत अकोला जिल्ह्यातील एकही ग्राम पंचायत कर्मचार्याचा अपघात विमा काढण्यात आलेला नाही. जर एखादा ग्राम पंचायत कर्मचार्याचा नकळत कर्त्यव्यावर असतांना अपघात झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद अकोला यांची राहील. तरी आम्ही दिलेल्या निवेदनाचा ताबडतोब विचार करुन सर्व पंचायत समितीला अपघात विमा काढण्याचे त्वरित आदेश देण्यात यावे.अशा आशयाचे निवेदन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी अकोला यांना देण्यात आले आहे.सदर निवेदनवर रविंद्र तुकाराम राठोड जिल्हाध्यक्ष,संतोष बावणे सचिव,दादाराव सोनोने कोषाध्यक्ष,सुनिल भराटे कार्याध्यक्ष,चंद्रभान घाड़गे उपाध्यक्ष,संतोष मोकळकार उपाध्यक्ष,सचिन गजानन जानूनकर सहसचिव,गजानन खेडकर संघटक,किसनराव जामोदे जेस्ठ मार्गदर्शक,मधुकर सराटे सदस्य,गजानन आडे सदस्य,प्रशांत धोटे सदस्य,भीमराव वानखडे सदस्य,उषा धुमाळे सदस्य यांच्या सह्या आहेत.