अकोट (देवानंद खिरकर) – कोरोनाच्या प्रसाराने शहरी भागासह आता ग्रामीण भागातही शिरकाव केला असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोरोना विषाणू चा अधिक प्रसार होऊ नये.यासाठी अधिकाकधिक सावधता ठेवत नियमांचे पालन करण्याची खरी गरज आहे.सोबतच कंटेन्मेंट झोन सह इतर भागातीलही नागरीकांनी आरोग्य विभागाला सर्वोप्तपरी सहकार्य करावे.जेणेकरून आपलं गाव लगेच कोरोना मुक्त होईल.अशी उपदेशक विनंती आमदार रणधीर सावरकर यांनी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर करोडी गावाची पाहणी करतांना कोरोनाच्या जनजागृती संदर्भात आपलं मत व्यक्त करतांना केली. करोडी येथे पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर लगेच करोडीत पोहचले. सोबत आरोग्य विभागाचा संपूर्ण ताफा हजर होता. गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार सावरकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी आसोले .ठाणेदार प्रेमानंद कात्रे, सरपंच अतुल नवत्रे ,विजयसिह सोळंके.मधुकर पाटकर ,जि प सदस्य गोपाल पेटे प स सदस्य संतोष शिवरकर.किशोर बुले.श्रीकांत गाडेकर.विनोद मंगळे.डॉ मनोहर चोकोते,संजय गेंड, प्रवीण डीक्कर , अतुल धुमाळे,मंगेश घुले,धीरज गावंडे ,सतीश धुमाळे,हरिषचन्द्र पाखरे,मनिष मोडक,अक्षय वसू, तुषार नवत्रे,मंगेश ताडे,पवन वर्मा सह आरोग्य विभाग,पोलीस विभागाचे कर्मचारी हजर होते.