अकोला,दि.15- जिल्हयात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरावर संशयित कोविड-19 रुग्णांची तपासणी करण्याबाबत वेब व्हिसीव्दारे जिल्हयातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना रॅपिड टेस्ट करण्याबाबतचे निर्देश दिले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले व तहसिलदार विजय लोखंडे यांची उपस्थिती होते.
प्रतिबंधीत क्षेत्रातील तसेच इतर क्षेत्रातील नागरिकांचे तपासणी करुन दुर्धर आजार, मधुमेह व उच्च रक्तदाब, किडनी इत्यादी आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची तसेच ज्या नागरिकांच्या ऑक्सीजनची कमतरता आहे अशा नागरिकांची वर्गवारी करुन रॅपिड टेस्टमध्ये समावेश करावा अशा सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिल्यात. प्रतिबंधीत क्षेत्रातील 50 ते 55 वयोगटाच्यावरील सर्व नागरिकांचा तपासणीमध्ये समावेश करावा यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करुन तपासणीबाबतचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात. याबाबतचा अहवाल दररोज जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात यावा.