• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला शहर व जिल्ह्यात १७ , १८,१९ जुलै पर्यंत संपूर्ण लॉक डाउन

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Media Desk by Media Desk
July 15, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, व्हिडिओ
Reading Time: 1 min read
88 1
0
43
SHARES
633
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.15- जिल्हयात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शुक्रवार (दि.17) च्या संध्याकाळी सात वाजेपासून शनिवार(दि.18), रविवार(दि.19) व सोमवार (दि.20)ते मंगळवार (दि.21) च्या सकाळी सात वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.

            याबाबत अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडनिस, अपर पोलिस अधिक्षक निकम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

            अकोला जिल्हयात कोविड-१९ विषाणूच्‍या प्रादुर्भावामुळे वाढती रुग्‍णसंख्‍या लक्षात घेता,  कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्‍यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे असल्‍यामुळे व विषाणुमुळे उद्भवलेल्‍या संसर्ग रोगाच्‍या नियंत्रणास्‍तव आपत्‍कालीन उपायोजना करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाल्‍यामुळे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा – २००५ , साथरोग अधिनियम अंतर्गत असलेल्‍या अधिकारान्‍वये दिनांक १७ जूलै २०२० चे सायंकाळी ७.०० वा. पासून  दिनांक २० जूलै २०२० चे मध्‍यरात्री  ००.०० वा. पर्यंत संपूर्ण अकोला जिल्‍हयामध्‍ये लॉकडाऊन जाहीर करण्‍यात येत असून मुक्‍त संचार करण्‍यास मनाई करण्‍यात येत आहे.

लॉकडाऊनचे कालावधीमध्‍ये खालील अत्‍यावश्‍यक बाबी व

सेवा मर्यादित स्‍वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील.

1)     दूध विक्री व  दुधाचे घरपोच वितरण सकाळी ६ ते ९  व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत अनुज्ञेय राहील.

2)     सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्‍सा सेवा  त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

3)     सर्व रुग्णालये व रुग्‍णालयाशी निगडीत सेवा, आस्‍थापना त्‍यांचे  नियमित वेळेनुसार सुरु राहतील.  व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. अन्यथा संबंधित सेवा संस्था कारवाईस पात्र राहील.

4)   सर्व औषधांची दुकाने तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा संपूर्ण कालावधी करता सुरु राहतील.

5)    पेट्रोल पंप मे. वजीफदार अॅन्‍ड सन्‍स वसंत देसाई स्‍टेडीयम जवळ अकोला, मे. एम.आर. वजीफदार अॅन्‍ड कंपनी, आळशी प्‍लॉट अकोला, मे. केबीको अॅटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला, महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाजवळील, मे. न्‍यु अलंकार सर्वो  पेट्रोलपंप, वाशिम बायपास, अकोला हे  सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत सुरू राहतील व ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा साखळीतल वाहनास इंधन पुरवठा करतील.

6)     प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये एक पेट्रोल पंप सुरु  राहील या बाबत उपविभागीय अधिकारी यांनी स्‍वतंत्र आदेश निर्गमित करावे.

7)    राष्‍ट्रीय व राज्‍य महामार्गावरील पेट्रोलपंप सुरु राहतील.

8)    वर्तमानपत्राचे वितरण सकाळी ६ ते ९ या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील.

                  वरील बाबी वगळून इतर सर्व सेवा, आस्‍थापना, प्रतिष्‍ठाने, दुकाने, राष्‍ट्रीयकृत व खाजगी बॅंक तसेच वित्‍तीय संस्‍था, उद्योग व इतर सर्व व्‍यवसायपूर्णतः बंद राहतील.

याशिवाय कोविड-१९ च्‍या अनुषंगाने  आवश्‍यक निर्देश

  1. जिल्‍हयातील सातही तालुक्‍यांच्‍या राष्‍ट्रीय महामार्ग, राज्‍य मार्ग, जिल्‍हा मार्ग व इतर अंतर्गत मार्ग इत्‍यादी रस्‍त्‍याच्‍या तालुकानिहाय सीमा बंद करण्‍यात येत आहेत.
  2. अत्‍यावश्‍यक सेवे व्‍यतिरिक्‍त कोणतीही व्‍यक्‍ती एका तालुक्‍यातून दुस-या तालुक्‍यात अथवा गावात प्रवेश करणार नाही.
  3. तालुकयाच्‍या सिमेवर पोलीस विभागाकडून चेकपोस्‍ट तैनात करुन नगरपालिका तसेच इतर यंत्रणेच्‍या माध्‍यमातून नियंत्रण ठेवण्‍यात यावे.
  4. विनापरवानगीने कोणत्‍याही मार्गाने सिमेच्‍या आत किंवा बाहेर जाणा-या व्‍यक्‍तींवर कायदेशिर कारवाई करण्‍यात यावी.
  5. सार्वजनिक/खाजगी क्रीडांगणे ,मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे संपूर्णता बंद राहतील. तसेच मॉर्निंग Morning Walk  व  Evening Walk प्रतिबंधीत राहतील.
  6. अकोट, मुर्तिजापुर, बाळापुर, पातूर व बार्शिटाकळी या शहरामध्‍ये तसेच ग्रामीण भागामध्‍ये  कोविड-१९ च्‍या प्रादुभार्वामुळे बाधित रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. या करिता आवश्‍यकता असल्‍यास नगरपरिषद क्षेत्रामध्‍ये  प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍याचे दृष्‍टीने दिनांक  २० जूलै २०२० नंतर संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी त्‍यांचे कार्यक्षेत्रामध्‍ये आवश्‍यकतेनुसार लॉकडाऊन बाबतचे  स्‍वतंत्र आदेश निर्गमित करण्‍याकरिता प्राधिकृत करण्‍यात येत आहे. .

                        या  आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुद्ध कोणतीही व्यक्ती संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कायदेशिर कारवाई करण्‍याशिवाय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम – २००५ यामधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्‍यास पात्र असतील.

                        या बाबत संबंधित व्यक्ती, आस्थापना मालक/चालक, आयोजक, व्यवस्थापक कार्यालये इत्यादी यांना प्रत्येकास स्वतंत्र नोटीस देणे शक्य नसल्याने साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून सदरचे आदेश एकतर्फी करण्यात आलेले आहे. या आदेशाद्वारे विहीत करण्‍यात आलेल्‍या कोणत्‍याही निर्बधांची किंवा, काढलेल्‍या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्‍याही व्‍यक्‍तीने, भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) याच्‍या कलम १८८ अन्‍वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानन्‍यात येईल.

Tags: lockdown in Akola city
Previous Post

आयआयटीच्या कोविड किट्सला आयसिएमआरची मान्यता केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे हस्ते लोकर्पण

Next Post

315 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 37 डिस्चार्ज, एक मयत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola corona updates

315 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 37 डिस्चार्ज, एक मयत

जिल्हाधिकारी

तालुकास्तरावर रॅपिड टेस्टव्दारे संशयित कोविड रुग्णाची तपासणी करावी वेब व्हिसीव्दारे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.