तेल्हारा (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज १५ जुलै ला तेल्हारा नगर पालिके मध्ये जाऊन नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप असल्यामुळे नगराध्यक्ष व मुख्याधिकार्यांच्या कशाला गढूळ पाण्याने भरलेल्या बॉटल भेट देऊन अभिनव आंदोलन केले या वेळी उपस्थित पाणी पुरवठा अधिकारी यांना संतप्त झालेल्या नागरिकांकडून गढूळ पाणी पाजण्याचा प्रयन्त करून गढूळ पाण्या बाबत पालिका पदाधिकारी व अधिकारी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयन्त झाला.
तेल्हारा शहरात अनेक दिवसांपासून नळा द्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गढूळ पाण्यामुळे पोटाचे आजार सुरू झाले असून किडनिवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गढूळ पाण्याबत पालिका शासन व प्रशासन झोपेत आहे का असा प्रश्न या वेळी नागरीकांनी उपस्थित केला आधीच कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक भयभीत झाले असून पालिकेच्या दुर्लक्षा मुळे नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज नगर पालिका गाठून अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत विचारावयाचे होते परंतु अध्यक्ष व मुख्याधिकारी पालिके मध्ये उपस्थित नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कुलूप असलेल्या कशाला सोबत आणलेल्या गढूळ पाण्याच्या बॉटल भेट देऊन अभिनव आंदोलन केले तसेच या वेळी उपस्थित पाणी पुरवठा अधिकारी यांना गढूळ पाण्याबाबत विचारणा करून ते पाणी पाजण्याचा प्रयत्न झाला व नागरिकांना पिण्यायोग्य पाणी न दिल्यास या पुढे तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या वेळी शहरातील महेश ठाकरे , विठ्ठल मामनकार , राजेश काटे , आकाश फाटकर ,स्वप्नील सुरे , संतोष खारोडे , नितीन मानकर ,विठ्ठल बनकर , रवी इंगळे , शंकरराव सुरे ,सागर सोनटक्के , दिपक टिकार ,अनिल फाटकर , अरुण कांगटे ,राजेश मामनकार ,पंकज सोनोने , पंकज गाडगे , शुभम सुरे , एकनाथ मानकर ,सागर खारोडे , साहेबराव देशमुख , अमोल अकोटकर , नारायण हागे , मनोहर फाटकर विश्वनाथआप्पा घोडेस्वार , श्रीराम सुरे ,ध्याणेशोर महारखेडे इत्यादी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते