हिवरखेड (धीरज बजाज)– नाफेड चना व मका खरेदी बाबत शासनाच्या उरफाट्या धोरणांमुळे त्रस्त होऊन तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध तक्रारींचा पाढा निवेदनातून मांडला आहे.
सविस्तर असे की शेतकऱ्यांना नाफेड अंतर्गत दी.८,१३ व१४ जुलाई करिता चना खरेदी साठी २२५८ शेतकऱ्यांना वाहनांमध्ये माल घेऊन बोलवण्यात आले आहे, परंतु मागील अनेक शेतकऱ्यांची भाडोत्री वाहने मागील ८-१० दिवसापासुन मोजणी झालेली नाही, शेतकऱ्यांना वाहन भाडे प्रती दिवस प्रमाणे द्यावे लागत आहे, उदा.- २००० रु रोज भाडे असेल तर उर्वरीत जिसके दिवस होतील ते १००० रु (एकुण भाड्याच्या ५०%) रोज द्यावे लागतील, या मोजणीस विलंबाची जबाबदारी कोणाची? नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?? पावसाचे दिवस असल्याने मालाचे नुकसान झाल्यास जबाबदारी कोण घेणार??? आजपर्यंत करोड़ों रुपये सेस जमा करणारे मार्केट मध्ये संपुर्ण चिखलाचे साम्राज्य, शेतकऱ्यांची वाहने चिखलात फसत आहेत, मार्केट ला कंपाउंड नाही, सुरक्षा रक्षक दिसत नाही, सि.सि.टि.व्ही. नाही, शेतकऱ्यांच्या मालाची चोरी ची जबाबदारी कोण घेणार???? एका शेतकऱ्यांचे नावे एका दिवशी २५ क्विंटल ची अट का?
शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाची योजना जर वरील प्रमाणे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करीत असेल म्हणजे २५-३० क्विंटल मालासाठी जर ७-८ हजार रु भाडे द्यावे लागत असेल तर शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना काय फायदा?? असे अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे अनेक वास्तविक प्रश्न या निवेदनातून करण्यात आले आहेत
सोबतच शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना ज्या दिवशी मोजमाप होईल त्या दिवशी बोलवावे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे. अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यां तर्फे तेल्हारा तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी राजकुमार भट्टड, राधेश्याम टावरी, आनंद राठी, राधावल्लभ भट्टड, यांनी दि.१४ जुलै रोजी अध्यक्ष/व्यवस्थापक, खरेदी विक्री संस्था, तेल्हारा यांना दिले आहे. निवेदनाच्या प्रतीलीपी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र, मा. पालकमंत्री अकोला, मा. जिल्हाधिकारी, अकोला, मा. जि.पणन अधिकारी
इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.
दुसरीकडे शेतकऱ्यांनी मक्क्याच उत्पादन घेतलं. बाजारात भाव नसल्याने सर्व मक्का नाफेड ला रजिस्टर केला. दिनांक ०९/०७/२०२० रोजी हिवरखेड, हिंगणी, खंडाळा, चीतलवाडी, दानापुर, इत्यादी अनेक गावातील शेतकर्यांना मोबाईल वर मेसेज नाफेड कडून आलेत. सगळ्यांना आडसुळ येथे माप असल्याचे सांगितले म्हणून सगळ्यांनी आडसुळ येथे मक्का भरून भर पावसात ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन गेले असता त्यांनी तेथील गोदाम फुलं झाले हे सांगून त्यांनी परत तेल्हारा येथे मक्का हलवण्यास सांगितला. म्हणून हिंगणी येथील शेतकरी ज्ञानदेव खडसे हे १० जुलै ला मक्का कसाबसा खराब रोड ने परत तेल्हारा घेऊन आले. १४ जुलै पर्यंत माल तिथच होता. माप आहे यासाठी सगळे शेतकरी तेल्हारा गेले असता खरेदी विक्री अधिकाऱ्याने साठा पूर्ण झाला असे म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना मक्का परत नेण्यास सांगितले. त्यामुळे सगळे शेतकरी तहसीलदार साहेबांकडे निवेदन घेऊन गेले असता तहसीलदार तेल्हारा यांनी उद्या बोलावलं आहे.
प्रतिक्रिया
जर उद्या काही झालं नाही तर आम्ही सगळे हिंगणी बु., खंडाळा, चीतळवडी, दानापुर, हिवरखेड चे शेतकरी मिळून आंदोलन करु याची तहसीलदार तेल्हारा यांनी नोंद घ्यावी.
ज्ञानदेव खडसे, शेतकरी, हिंगणी.
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड आणि जाणीवपूर्वक होणारा त्रास थांबवायचा असेल तर शासनाने ज्या दिवशी मोजमाप केल्या जाईल त्याच दिवशी शेतकऱ्याचा माल बोलवावा.
राजकुमार भट्टड, प्रयोगशील शेतकरी, सौन्दळा.